बोरगांव बू. येथे सर्व शिक्षा अभियानांतर्गत दोन वर्ग खोल्यांचे भूमिपूजन भाजप नेत्यांच्या हस्ते संपन्न

वसमत - विजय डाढाळे

वसमत तालुक्यातील मौजे बोरगांव बू येथे गिरगांव गटाचे जिल्हा परिषद सदस्य विलासराव रायवाडे यांच्या प्रयत्नातून सर्व शिक्षा अभियानांतर्गत बोरगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी दोन वर्ग खोल्यांसाठी 17 लक्ष रू निधी उपलब्ध करून दिला आहे,गावातील विद्यार्थ्यांची हेळसांड होत असल्याचे समजताच त्यांनी पाठपुरावा करून 17 लक्ष रू. निधीतुन दोन वर्ग खोल्याचे काम मार्गी लावल्याने आता विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही,

सर्व शिक्षा अभियानांतर्गत उपलब्ध केलेल्या 17 लक्ष रू निधीचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी वसमत भाजपा नेते नाथराव कदम, तालुका अध्यक्ष खोब्राजी पाटील नरवाडे, माजी उपसभापती विजयराव नरवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी जाधव, रमेश दाळपुसे, ज्ञानेश्वर मुंजाळ, बोरगांव सरपंच सातभाई, ज्येष्ठ नागरीक दगडु मामा, उत्तमराव सातभाई, बालाजी शिंदे, कैलास सातभाई, दिलिप सातभाई,शालेय व्यवस्थापन अध्यक्ष, मुख्याध्यापक शिक्षक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गावकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य विलासराव रायवाडे यांचे आभार व्यक्त केले.


Comments