भाजप प्रणीत रेणुकामाता शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी.
वसमत (प्रतिनिधी) :- वसमत तालुकयातील रेणकापुर वि.का.से.सह.सोसायटीची निवडणुक दि.24 मे 2022 रोजी पार पडली त्यानुसार पॅनल प्रमुख प्रभाकर केशवराव रेंगे पाटील, केशवराव कलंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत रेणुकामाता शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 13 सदस्य विजय झाले व दि.02 जुन 2022 गुरुवार रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड करण्यात आली, चेअरमन पदी बाबारावजी दगडोजी कलंदर पाटील तर मधुकर रामराव कलंदर पाटील यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
बाबारावजी दगडोजी कलंदर हे मागील 10 वर्षापासुन रेणकापुर सोसायटीचे चेअरमन म्हणुन काम पाहत आहे, गांवकर्यांनी त्यांचर विश्वास करुन तिसर्या वेळेस काम करण्याची संधी दिली म्हणुन बाबारावजी दगडोजी कलंदर यांनी सर्व गांवकरी मंडळी, मतदार, ज्ञात, अज्ञातांचे सहकार्य बद्दल आभार व्यक्त केले.
व सदर चेअरमन निवड कार्यक्रम करिता संस्थेचे संचालक कलंदर नागोजी भिवाजी, कलंदर शिवाजी ग्यानोजी, कलंदर ज्ञानोबा बापुराव, जाधव यादव खोब्राजी, रेंगे अशोक देवराव, रेंगे माधवराव जळबाजी,कलंदर निर्मलाबाई बालासाहेब, रेंगे कमलाबाई गंगाधर, दाजीगुरु नामदेव उराडे, प्रकाश माणिकराव बाभडे, पंडीत नामदेव भिसे हे उपस्थित होते. तसेच पॅनल प्रमुख प्रभाकर केशवराव रेंगे पाटील, केशवराव कलंदर पाटील उपस्थित होते.
सदरील निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन डी.एल.डुकरे यांनी कामकाज पाहिले.
**********


Comments
Post a Comment