वसमत येथे टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन थाटात संपन्न

खेळामध्ये सगळे जिंकू शकत नाही पण जे खेळतात ते आयुष्य जिंकून टाकतात... दांडेगावकर


वसमत प्रतिनिधी (नवीद अहेमद) :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वासर्वे मा. कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त वसमत येथील जिल्हा परिषद मैदान येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पोर्ट्स  असोशियन संचालित 

 टेनिस बॉल क्रिकेटचे खुले सामने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठेवण्यात आले. याप्रसंगी क्रिकेट खुले सामन्याचे उद्घाटन   राष्ट्रीय साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

सदरील सामन्याचे प्रथम बक्षीस हे खासदार शरद चंद्रजी पवार यांचे ८२ वे वाढदिवस असल्याने प्रथम बक्षीस   ८२०८२ रुपये   शेख हबीब शेख बशीर, यशवंत उबारे, कलीम पठाण (किसान ट्रॅक्टर) यांच्यातर्फे घोषित करण्यात आले. तर द्वितीय बक्षीस ५२०८२ रुपये डॉक्टर मारोती क्यातमवार, शेख रियाज उद्योजक कुरुंदा यांच्यातर्फे घोषित करण्यात आले. तरी या सामन्याचे चषक दिलीप भोसले पाटील यांच्या वतीने घोषित करण्यात आले. या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज हे शेख यासीन  टेंभुर्णीकर यांच्यातर्फे, तर बेस्ट बॅट्समेन, अभियंता अश्रफ अली यांच्यातर्फे बेस्ट बॉलर मुस्ताखिम बेलीफ यांच्यातर्फे बेस्ट फिल्डर नय्यर खान यांच्यातर्फे , बेस्ट कीपर अफरोज एलोरा यांच्यातर्फे ठेवण्यात आले. या उद्घाटन सोहळा समारंभ प्रसंगी राष्ट्रीय साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की,खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त  वसमत येथे वेगवेगळ्या कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येत असून त्यातच  टेनिस बॉल क्रिकेट चे खुले सामने हे  मोठ्या प्रमाणे घेण्यात येत आहे याचा मला आनंद वाटते पुढे बोलताना ते म्हणाले की खेळामध्ये सगळेजण जिंकू शकत नाही परंतु जे खेळतात ते आयुष्य जिंकून टाकतात असे मत व्यक्त केले. या क्रिकेट खुले सामन्याचे  उद्घाटन सोळाप्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद फारूक, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष गौतम दवणे, महिला प्रदेश सचिव रत्नमाला शिंदे ताई,  शहराध्यक्ष शेख आयुब पापुलर, महिला शहराध्यक्षा मुनिता जाधव, नगरसेवक एडवोकेट शेख मोहसीन, नगरसेवक सचिन दगडू, अल्पसंख्याक शहराध्यक्ष सरफराज काझी, सामाजिक न्याय शहराध्यक्ष भीमराव सरकटे, संपादक टेनिस बॉल क्रिकेट असोशियन हिंगोली उपाध्यक्ष फेरोज पठाण, तारीख व तसेच इस्रार अहमद, शेख जावेद जीलानी, तन्वीर अहमद, शेख सत्तार, इम्रान फारुखी, नाहीद सिद्दीकी, निसार पेंटर,इकबाल पठाण, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते. सदरील टेनिस बॉल क्रिकेट सामने यशस्वी करण्याकरिता टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन हिंगोली चे सचिव अमजद खान उर्फ नम्मु , मोहम्मद साजिद, इरफान सिद्दिकी, नवीद अहेमद,जुनेद चाऊस,युनुस खान,मसूद शरीफ, असद खान बब्बु, तालेब,रहीम खान, कलीम लाला,यांचे मोलाचे कार्य आहे.

   



************





Comments