महान कार्याची योजना, अमर्याद धैर्य, प्रचंड कार्यशक्ती आणि त्याहुनही आधिक सर्वोत्तम आज्ञाधारकपणा या सगळया गोष्टींचा सुंदर मिलाफ म्हणजे आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेबांच व्यक्तीमत्व.
महाराष्ट्र राज्य व भारत सरकार या दोन्ही स्तरावर आपले विचार, वर्तन आणि व्यक्ती चिरंतन ठसा उमटविणारे असामान्य बुध्दीमता कौशल्य आणि जनसामान्याच्या मनात कायम आदराचे स्थान मिळविणारे व्यक्तीमत्व म्हणजे साहेब. साहेबांनी आपल्या चौरस व्यक्तीमत्वाने महाराष्ट्राचे व बहुजन समाजाचे नाव मोठे केले. स्वच्छ कार्यतत्पर शिस्तप्रिय लोकाभिमुख कारभार यांच्या जोडीला साहेबांची दुरदृष्टी ,सुसंस्कृतपणा समन्वयवादी भुमिका व मुल्याधिष्ठीत कारभारशैली यामुळे ते ज्या क्षेत्रात पाय ठेवतील तेथील कारकीर्द इतरांपेक्षा उठुन दिसते.
जयप्रकाशजी दांडेगावकरजी साहेब या नावाभोवती खुपमोठ सामाजिक व राजकीय वलय आहे. ते एका झंझावाती प्रवासाच प्रतिक आहेत. खरतर त्यांच्या बद्दल लिहण्या, बोलण्या एवढा मोठा मी नाही पण त्यांच्या जीवनाला अभ्यासणारा एक विद्यार्थी म्हणुन मी त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न करत आसतो. साहेबांनी समतावादी आणि सत्यशोधक विचारांचा सातत्याने पुरस्कार केला. हिंस्सा व सांप्रदायीक राजकीय आचार यामुळे मानवाचे प्रश्न सुटणार नाहीत. नवी क्रांति नवा समाज घडवायचा असे तर त्यासाठी बदल गरजेचा आहे. आणि बदलाच्या प्रक्रियेत बहुतांश लोक सहभागी होणे गरजेचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल खर पण बेराजगारी, नापिकी , शिक्षणाचा अभाव, व्यसनाधीनता आणि कवडीमोल जाणारा शेतमाल असे असं‘य मानव जातीला भेडसावणारे जटील आणि गहण प्रश्नांची उत्तरे शोधुन, त्यावर मार्ग काढुन अश्या असं‘य गोष्टींवर झगडण्याचा जो मुलभुत दृष्टीकोन साहेबांनी जगासमोर ठेवला तो आम्हाला आकर्षित करतो. यासाठी साहेब ज्या प्रकारच्या त्यागाची अपेक्षा करतील तो त्याग करण्यास हजारो मानसे पुढे येत असतात.
दांडेगावकर साहेब म्हणजे एक व्यक्ती नव्हे तर तो एक विचार आहे. जसा विचार आहे तसा आचार सुध्दा आहे. साहेबांच्या हाताचा परिस स्पर्श ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला झाला त्यांच्या त्यांच्या जीवनाचे सोने झाले. नावामध्ये तिर्थाच पावीत्र्य असलेल्या साहेबांच्या मातोश्री स्वर्गीय गंगामाई रावसाहेब साळुंके यांच्या उदारमतवादी आणि समाजशिल संस्कारामध्ये दांडेगावकर साहेबांची जडण घडण झाली. राजकारण असो की समाजकारणात पडायचे असेल तर पुर्वसुरींच्या पाऊल खुणा शोधाव्या लागतात. वाटा मुकर्रर कराव्या लागतात निर्धार बाणावा लागतो. जीवाला जीव देणारी निष्ठावंत निर्माण करावी लागतात. वैचारीक बैठक निर्माण व्हावी लागते. यासाठी लागतो तो ऐक्याचा विचार, ध्येय आणि मुल्याधिष्ठीत कारभार शैलीची जोड साहेब कृषि विषयामध्ये विशेष प्राविण्यासह गोल्ड मेडेलिस्ट असुन सुध्दा त्या काळात नौकरीमागे न धावता साहेब शेतीकडे वळले. साहेबांचे आजोबा स्वर्गीय हनवंतरावजी साळुंके यांच्या पावलावर पाऊल ठेवुन समतेच्या आणि लोकशाहीच्या मार्गावर चालुन सामाजीक क‘ांती हेच आपल्या जीवनाचे मु‘य ध्येय ठरवुन साहेबांनी एक नव विचार साम‘ाज्य उभ केल. जिंकण रक्तात असो वा नसो पण झुंज देण हे रक्तात असायलाच हव आणि हे झुंज देण्याच बाळकडु साहेबांना त्यांचे आजोबा स्व. हनवंतरावजी साळुंके यांच्याकडुन मिळाले. कारण कोणत्याही महत्कार्याला काही कारण परंपरा लागते त्या परंपरेची एक मजबुत कडी म्हणजे स्व. हनवंतरावजी साळुंके. डॉ. बाबासाहेब अंबेडकर , महात्मा फुले, राजश्री शाहु महाराज आणि गांधी विचारासोबत सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे नेण्याच काम स्व. हनवंतरावजी साळुंके यांनी केल. त्यांच्याच वैचारिक संस्कारामुळे जनतेची सेवा दिर्घ काळ निरलसपणे करण्याच महत्कार्य दांडेगावकर साहेबांच्या हातुन घडत आहे.
साहेबांनी सहकार चळवळीच्या माध्यमातुन रचनात्मक कृती कार्यक‘म हाती घेतले असले तरीही समाजामध्ये होत असलेला अन्याय, अत्याचार बघुन त्यांच्या मधला आंदोलनकारी, क्रांतिकारक जागा होतो. सार्वजनिक जीवनाला एक नवा आशय आणि नवा अर्थ देण्याच सामार्थ्य साहेबांच्या विचारा मध्ये आहे. आणि म्हणुनच सामाजीक क्रांतीचे मनसुबे उराशी बाळगुन इ. स. 1994 मध्ये उगवत्या सुर्याचे चिन्ह घेवुन महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवणारे साहेब देशात आज करोडो लोकांच्या मनात घर करुन आहेत. महाराष्ट्र त्यांच्याकडे एक निष्ठावंत आदर्श राजकीय नेता आणि खाजगी आयुष्यात मुल्याधिष्ठीत जीवन जगणारी लोकप्रिय व्यक्ती म्हणुन त्यांच्याकडे पाहतो आणि पाहत राहिल.
माझ्या पिढीतील अनेक तरुणांना असे वाटते की , साहेब देवा धर्माला जास्त मानत नाहीत कुठतरी मंदीरात जाऊन देवाच्या पाया पडणे , देवाधर्माच्या नावावर घोषणा देऊन मानसांना भावनिक करुन आपली राजकीय पोळी भाजुन घेण हे मुळात त्यांना कधी पटलच नाही आणि कधी जमलही नाही. यामुळे मला इथे काही गोष्टी प्रकर्षाने सांगाव्याश्या वाटतात. आठवे ज्योतीर्लिंग श्री क्षेत्र औढा नागनाथ, बाराशिव हनुमान, शिरडशहापुर येथील भगवान महाविरांच जैन मंदीर , हट्टा येथील महादेव मंदीर तालुक्यातील अनेक तिर्थ स्थळांना भक्तीनिवास , सिमेंट रस्ते , पथदिवे, संरक्षण भिंत , सामाईक टॉयलेट असे अनेक विकास कामेही साहेबांच्या कार्यकाळात झाले. दर्गाहचा विकास गावतेथे समाज मंदीर बांधणे गाव तिथे वाचनायल हा उपक‘म साहेबांच्या कार्यकाळातच राबविला गेला. सतत काहीतरी चांगल करत राहणे यातच त्यांना खरा आनंद मिळतो. काही मिळविण्यासाठी काहीतर करणे या गोष्टीने त्यांच्या मनाला कधीही शिवल नाही. संत सावता महाराजाच्यां , कांदा मुळा भाजी अवधी विठाई माझीलसुन मिरची कोथींबीरी अवघा झाला माझा हरी या अभंगाप्रमाणे साहेबांनी शेती,शेतकरी,कष्टकरी आणि मातृसेवेतच देव बघितला साहेबांच जीवन व त्यांचे विचार यामध्ये जो क्रांतीकारक आश्यय आहे तो समजुन घेण्याची प्रेरणा आज समाजामध्ये निर्माण झाली आहे. त्यांनी दिलेले जे विचार आहेत ते युगायुगांत पुरविणारे विचार आहेत. साहेब कोणा विशिष्ट समाजासाठी विशिष्ट मानसा साठी जगले नाहीत. जात , धर्म , गरीबी , श्रीमंती यापलीकडे जावुन त्यांनी लोकोध्वार घडविला आणि म्हणुनच त्यांच्या विचारांची उजळणी आज घडु लागली आहे. दांडेगावकर साहेब म्हणजे सर्वश्रेष्ठ राजकारणी युगपुरुष आहेत अशी भावना सर्वांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. मनभर विचार कितीही आदर्श असले तरीही परीवर्तनासाठी सहाय्यकारी ठरु शकत नाहीत अस यशवंतरावजी चव्हाण साहेब एका उता-यात सांगतात.
चागल्या विचाराची सोबत घेवुन त्याला कृतीची जोड दिल्यामुळे वर्तमान काळाच्या किती तरी पुढे जाऊन साहेबांनी समाज घडविला.
राजकारण म्हणजे निवडणुक लढवणे किंवा कारभार पाहण्याच साधन नसुन सार्वजनिक जीवनाचे उदीष्ट आणि देशाचा विकास करण्याचे साधन म्हणुन साहेबांनी राजकारणाकडे बघितल. सामान्य मानसाचा हात हातात घेवुन संघटीतपणे रचनात्मक कृती कार्यक‘म हाती घेवुन सहकार चळवळीच्या माध्यमातुन सामान्य मानसाचा उध्दार करण्याच्या प्रर्कीयेत साहेबांनी स्वत:ला वाहुन घेतले. पुढे शेवटच्या मानसाचा उध्दार व त्याचे सशक्तीकरण हेच साहेबांच्या जीवनाचे मु‘य ध्येय बनले त्यांच्या या विचारामुळे समाज जीवन संपन्न झाले.
एकेकाळी घरात मडक्याच्या उतरंडीमध्ये पैसा ठेवणारा सामान्य मानुस व शेतकरी राजा बँकेत पैसा जमा करु लागला या गोष्टीला फार मोठा अर्थ असुन अर्थशास्त्राच्या दृष्टीने याला फार मोल आहे. एन. डी. डी. बी. या योजनेच्या माध्यमातुन सुरु केलेल्या दुध डायरियामुळे दुग्ध व्यवसायाला स्पर्धा मिळाली आणि रखडत रखडत चालणा-या शेतकरी राजाच्या संसाराच्या गाडीला दुधा तुपासारखी स्निग्धता आली . गरीबीने काळीज जळणा-या घरामध्ये समृध्दीचा उजेड पडला साहेबांचा हा निर्णय ऐतिहासिक राहिला.
साहेबांनी केलेले बहुमोल कार्य भावी पिढयांना स्फुर्ती देत राहिल. त्यांचा कार्यकर्ता म्हणवुन घेण आमच्या पिधीतील तरुणांचा हा बहुमान घडला हे आमचे सदभाग्य आहे. महाराष्ट्रातील व देशातील बहुजनांच्या, सामान्य जनतेच्या व शेतक-यांच्या प्रश्ना बाबत साहेब थंड स्वभावाने खोल व अचुक निर्णय घेत असतात. साहेबांच्या स्पर्शाने या जिल्हयामध्ये अनेक संस्था वाढल्या व मोठया झाल्या आहेत. लोकांच्या आपुलकी आणि जिव्हाळया पोटी येणा-या हिंगोली लोकसभेचे नेतृत्व करुन मतदानरुपी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जनेतेला साहेबांनी दिली पाहिजे अश्या सामान्य मानसाच्या भावना आहेत.
ज्ञानदिप लाऊ जगी. कयाधु काठावरील संत नामदेव महाराजांनी जगाला हे स्वप्न दाखविले. पण ज्या जिल्हयान जगाला ज्ञानाचा परिवर्तनाचा मार्ग दाखविला त्याच हिंगोली जिल्हाचा काही भाग या स्पर्धेच्या युगात विकासापासुन वंचित आहे. आजुबाजुच्या जिल्हयातील विकास व उद्योगधंदे पाहिले असता त्या दृष्टीने या जिल्हयातील विकास व उद्योगधंदे गटांगळया खात असतांना दिसतात. राजीव भाऊं सार‘या राष्ट्रीय नेतृत्वाला काळाने घेरल आणि या जिल्हयाच खुप मोठ नुकसान झाल. आपल्या जिल्हयात दरबारात आपल्या कामाचा व व्यक्तीमत्वाचा दबदबा असणारे नेतृत्व म्हणजे जयप्रकाशजी दांडेगावकर साहेबच आहेत. त्यामुळे आगामी 2024 च्या लोकसभेमध्ये साहेबांनी या जिल्हयाचे नेतृत्व केल्यास सर्व सामान्य मानुस व शेतकरी राजासाठी प्रगतीची दारे खुले होऊन हिंगोली जिल्हयाच सुराज्यात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही.
चांगल्यांना तसच वाईटांना जवळ करुन त्यांना समाज सेवेला जुंपण्याच कौशल्य साहेबाखेरीज दुसर कुणात आढळणार नाही. त्यांच्या या गुणांच कौतुक तसेच टिका- निंदा करणारे भरपुर आढळतील पण या निंदा स्तुतीचा त्यांच्यावर कधीही परिणाम होत नाही. टिका-निंदा आणि स्तुती सम बुध्दीने पचवुन दिवा लावण्यापेक्षा स्वत: दिवा होऊन साहेब आयुष्यभर जळत राहिले. साहेबांच आयुष्य म्हणजे या मातीत जन्मलेल्या मानसासाठी दिवाळीचा सणच त्यांच्या आयुष्यात अनेक वादळे आली संकटे आली या संकटांमध्ये कोलमडून न पडता संकटांना पायदळी तुडवित विकासाचा , विचाराचा आणि शिक्षणाचा ज्ञानदिप तेवता ठेवुन स्वकृतुत्वाने साहेब स्वयंप्रकाशित झाले. कामावर अपार श्रध्दा असलेल्या साहेबांनी प्रसिध्दीचा हव्यास कधिच केला नाही. प्रसिध्दी आणि मान सन्मान त्यांच्या शोधात आले.
एकीकडे साहेब सा-या जगाचा प्रपंच करत असतांना साहेबांचा कौटुंबीक प्रपंच आणि साहेबांचा राजकीय गोतावळा आपल्या मायेने बांधुन ठेवणा-या मातृ-हदयी आई साहेब ज्योतीताई दांडेगावकरांनी आतिशय धिरोदात्तपणे सांभाळ केला. आज दिपावलीच्या निमित्ताने हा कृतज्ञतेचा अक्षरदिप साहेब आणि आईसाहेबांच्या चरणी समर्पित करतो.
नागनाथ नारायण डाढाळे वाखारीकर (मो. नं.- 7559475467)
*********************************




Comments
Post a Comment