हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात 22 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआरद्वारे औंढा ना. परिसर 03 व्यक्ती व कळमनुरी परिसर 19 व्यक्ती असे एकूण 22 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 02 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 01 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 509 रुग्ण झाले असून, त्यापैकी 19 हजार 69 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 37 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 403 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment